धक्कादायक ! पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांना लुबाडले
धक्कादायक ! पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांना लुबाडले
img
वैष्णवी सांगळे
रत्नागिरी : पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून विवाह संकेतस्थळावरुन लग्न ठरवून महिलांची फसवणूक करणार्‍या आरोपीला अटक  करण्यात आली आहे.


वैभव नरकर असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा रत्नागिरीचा आहे. नरकर हा स्वत:ला पोलीस उपनिरीक्षक म्हणून भासवत होता. एका विवाह संकेतस्थळावरून त्याने महिलांना फसवले, एका महिलेवर बलात्कार केला आणि अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नरकर याने सोशल मीडीयावर आणि विवाह संकेतस्थळांवर स्वतःचे पोलीस गणवेशातील फोटो वापरून बनावट प्रोफाईल तयार केली. चेंबूर येथील 33 वर्षीय महिलेला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला.

 त्यानंतर तिच्याकडून एक स्कूटर, 2.5 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह 30,000 रोख उकळले. नरकरने याआधी सोलापूरच्या एका महिलेलाही अशाच प्रकारे फसवले होते. विवाह जुळविणार्‍या एका संकेतस्थळावरून त्या महिलेशी ओळख करून घेतली आणि लग्नासाठी घरी येण्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याने आपल्या नातलगाचा अपघात झाल्याचे सांगून 63,000 रुपये मागितले. 

पैसे घेतल्यानंतर संबंधित महिलेला तो आधीच विवाहित असल्याचे समजले. त्याचबरोबर नरकरने स्वत:ला मंत्रालयातील मोठ्या अधिकार्‍याचा सहाय्यक असल्याचे भासवून 100 हून अधिक बेरोजगार युवकांना पोलीस किंवा सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. काहींना तर पोलीस गणवेश शिवून घेण्यास सांगितले. अनेक पीडितांनी लाज आणि सामाजिक अपमानाच्या भीतीने तक्रार दाखल केलेली नाही. नरकर याला रत्नागिरी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अटक केली होती. जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा फसवणूक सुरूच ठेवली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group