काय चाललंय काय ? पोलिसांच्या हातावर तुरी देत चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणारा आरोपी फरार
काय चाललंय काय ? पोलिसांच्या हातावर तुरी देत चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणारा आरोपी फरार
img
वैष्णवी सांगळे
भिवंडी न्यायालयाच्या परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुनावणीसाठी आलेला आरोपी बेसावध असलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालयाच्या आवारातून पसार झाल्याची संतापजनक घटना घडली. सलामत अली अन्सारी असे फरार आरोपीचे नाव असून त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती. एका चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. या घटनेनंतर पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.


हे ही वाचा ! 

भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतील एका चाळीत राहणाऱ्या 6 वर्षीय चिमुरडीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर त्या चिमुरडीची हत्या करून तिचा मृतदेह एका बंद असलेल्या खोलीतील बादलीत कोंबून ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी सलामत अन्सारी याला पोलिसांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी बिहार येथून ताब्यात घेत अटक केली होती. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून तो सध्या ठाणे कारागृहात बंदी होता.

सोमवारी न्यायालयीन सुनावणीसाठी सलामत अली याला ठाणे कारागृहातून भिवंडी न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी सलामत अली याने बंदोबस्तावरील पोलिस बेसावध असल्याचा फायदा घेत न्यायालयाच्या आवारातून पोबारा केला. त्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. पण तो आढळून आला नाही. या संदर्भात अजून गुन्हा दाखल करण्यात आला नसून पोलिस पसार झालेल्या सलामत अलीचा शोध घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group