पबजी खेळता खेळता पिस्तुलीतून सुटली गोळी, तरुण गंभीर जखमी, कुठे घडली घटना ?
पबजी खेळता खेळता पिस्तुलीतून सुटली गोळी, तरुण गंभीर जखमी, कुठे घडली घटना ?
img
वैष्णवी सांगळे
पबजी सारख्या ऑनलाइन गेम्सच्या व्यसनाधीनतेमुळे अनेक धोके समोर आले आहेत. पिस्तूलसारखी शस्त्रे हाताळताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, खासकरून जेव्हा ती मुलांच्या हाती पडतात. आम्ही या ऑनलाईन गेममधील पिस्तूलबाबत नाही तर खऱ्या पिस्तूलबद्दल बोलत आहोत. पुण्यातील उत्तमनगर भागात तरुणाकडून पिस्तूल लोड अनलोड करताना अचानक गोळी सुटली आणि भयंकर घटना घडली. गोळीबाराच्या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलं. 

उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील उत्तमनगर परिसरात ५ तरुण हे त्यांच्यापैकी असलेल्या एकाच्या घरात बसून "पबजी" मोबाईल गेम खेळत होते. दरम्यान, यातील एकाने त्याच्याकडे असलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि तो इतर मित्रांना दाखवायला लागला. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हे पिस्तूल लोड अनलोड करण्याच्या नादात यातील एकाच्या हातातून पिस्तुलातून गोळी बाहेर पडली आणि थेट समोर बसलेल्या मित्राच्या पायाला लागली. 

हे ही वाचा ! 

ही सगळी घटना कोणाला कळू नये म्हणून या मित्रांनी एक बनाव केला. जखमी झालेल्या तरुणाने पोलिसांना फोन करून त्याच्यावर गोळीबार झाला असल्याची खोटी माहिती दिली. तपासाअंती पोलिसांना या तरुणांवर संशय आला. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच या तरुणांनी घडलेला खरा प्रसंग सांगितला. उत्तमनगर पोलिसांनी या तरुणांपैकी एकाकडे असलेले पिस्तूल जप्त केले असून या सर्व ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
Pune | pubg | pistol |
इतर बातम्या
Join Whatsapp Group