फटाके फोडताना बेजबाबदारपणा ? १३ दुचाकी व ३ चार चाकी गाड्या जळाल्या
फटाके फोडताना बेजबाबदारपणा ? १३ दुचाकी व ३ चार चाकी गाड्या जळाल्या
img
दैनिक भ्रमर

ठाणे : फटाके फोडताना बेजबाबदारपणा केल्याने १३ दुचाकी व ३ चार चाकी गाड्या जळाल्याची घटना ठाण्यात घडली.

ठाण्यातील पाचपाखाडी येथील कचराळी तलावाजवळ सरोवर दर्शन टॉवरमध्ये ही दुर्घटना घडली. ठाणे पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असल्याने ही दुर्घटना घडली. पार्किंग सारख्या दाटीवाटीच्या भागात फटाके फोडल्याबद्दल पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पहावे लागणार आहे. 

पार्किंगमध्ये पहिल्या मजल्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लागल्याची माहिती पाचपाखाडी अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानंतर त्वरित घटनास्थळी नौपाडा पोलीस कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान पोहचले. त्यांनी तब्बल ४५ मिनिटांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group