मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. अशातच नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७व्या मजल्यावर आज सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.
सध्या इमारतीच्या सर्व मजल्यावरील रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच धावपळ होत आहे.
एनआर कॉम्प्लेक्समधील एका इमारतीच्या १७व्या मजल्यावरील एका प्लॅटला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच सर्वत्र आरडाआरोड सुरु झाली. इमारतीतील रहिवाशांनी जीव मुठीत घेऊन बाहेर धाव घेतली. स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सध्या अग्निमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत घर पूर्णत: जळून खाक झालं आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.