नाशिक :- खुटवडनगर परिसरात सुखकर्ता हॉस्पिटल समोर एका इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुटवडनगर परिसरात सुखकर्ता हॉस्पिटल समोर देवाआशा इलेक्ट्रॉनिक्स नावाचे शोरूम आहे. आज सायंकाळी अचानक शोरूमला आग लागली. आग लागल्याचे समजताच कर्मचारी व नागरिकांची धावपळ उडाली.
क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
मुख्य अग्निशमन केंद्र, सिडको, सातपूर, नाशिकरोड येथील एकूण 10 बबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आली. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.