भिवंडी : आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडीत आगीची भीषण घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातील राहणाळमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. भिवंडीमधील प्रेरणा कॉम्पलेक्समधील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेने परिसरातील सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , भिवंडीतील राहणाळ येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे गोदामात ठेवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक साहित्याला आग लागली. या गोदामाला नेमकी आग कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीची माहिती समजताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं.
आग लागल्यानंतर अग्निशामक दलाची एक गाडी आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहोचला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.