राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. हजारो उमेदवारांचे महापालिकेतील राजकीय भवितव्य मतपेटीत कैद होत आहे. मात्र मतदान सुरु झाल्यानंतर पहिल्या तासाभरामध्येच राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे उमेदवारांसह मतदारही संताप व्यक्त करत आहे.
राज्यात नाशिक, पुणे, नागपूर, चंद्रपूर, ठाणे, नागपूर, मुंबईसारख्या अनेक प्रमुख शहरामंध्ये ईव्हीएम बंद पडल्याने सकाळीच मतदानासाठी आलेल्या नागरिकांना तात्कळत रहावं लागलं. एकीकडे ईव्हीएमसंदर्भात राज्यभरातून तक्रारी नोंदवल्या जात असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये एक धक्कादायकी प्रकार समोर आलं आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये सेंट झेवियर्स या शाळेत रूम नंबर १० आणि १२ या ठिकाणी मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही वेळ तात्काळत उभे राहावं लागले. रूम नंबर १० येथील मशीन मध्ये बिघाड होता तर रूम नंबर १२ मध्ये मशीनला करंट (शॉक) लागत होता त्यामुळे हे बिघड दुरुस्त करण्यासाठी सुमारे अर्धा तासाचा कालावधी गेला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.