डोंबिवली : डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात आणि आकाशात धुराचे लोट पसरले. त्यामुळे परिसर अक्षरशः काळवंडला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या परिसरातील जमीन थरथरली. तर काही घरांच्या काचाही फुटल्या. आगीचे लोळ आणि धुराचे लोटांनी आकाश अक्षरशः काळवंडलं होतं. या दुर्घटनेत पाच ते सहा नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या भीषण स्फोटानंतर परिसरात राहणारे नागरिक घाबरले. भीषण स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आहेत. या कंपनीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रयत्न सुरु आहेत. या स्फोटाच्या घटनेत ५ ते ६ कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.