एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी गणेश राठोड यांची नियुक्ती
एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी गणेश राठोड यांची नियुक्ती
img
दैनिक भ्रमर

नाशिक  (भ्रमर प्रतिनिधी) :  नाशिक एमआयडीसीच्या प्रादेशिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी उपजिल्हाधिकारी गणेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबईतील धारावी प्रकल्पासाठी नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांचीदेखील बदली करण्यात आलेली आहे.

राज्य शासनाने मंगळवारी चार उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये नाशिकला महाराष्ट्र प्रादेशिक औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात काम केलेले गणेश राठोड यांना एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी नियुक्त करण्यात आलेले आहे. मागील काही महिन्यांपासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये होते.

त्याचप्रमाणे मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी प्रकल्पामध्ये नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळातून प्रतिनियुक्तीवर गेलेले उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांची जळगावला उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे. उदयसिंह भोसले यांची धाराशिवमधून अमरावती येथे बदली करण्यात आलेली आहे, तर नागपूरचे उपजिल्हाधिकारी श्रीराम मुंदडा यांची नागपूर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आलेली आहे, अमरावती येथे असलेले अनिल भाटकर यांची बदली यवतमाळ येथे करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने मंगळवारी अचानक या बदल्या केल्यामुळे येणार्‍या काही दिवसांमध्ये अजून बदल्या होण्याचे संकेत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group