कपड्याच्या दुकानाला भीषण आग ; 7 जणांचा गुदमरून मृत्यू
कपड्याच्या दुकानाला भीषण आग ; 7 जणांचा गुदमरून मृत्यू
img
दैनिक भ्रमर
छत्रपती संभाजीनगरातून मोठी बातमी समोर येत आहे. येथील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून यात दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

या मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा देखील समावेश आहे. ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हे कपड्याचं दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.


याबाबत माहिती देताना औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितलं की, "पहाटे चारला छत्रपती संभाजीनगरातील कॅन्टोन्मेंट परिसरात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. प्राथमिक तपासानंतर या दुर्घटनेत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मात्र, या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. सध्या पुढील तपास सुरू आहे."
इतर बातम्या
Join Whatsapp Group