मोठी बातमी : खासदार संदिपान भूमरेंच्या अडचणींत वाढ होणार? ; नेमकं काय आहे प्रकरण?
मोठी बातमी : खासदार संदिपान भूमरेंच्या अडचणींत वाढ होणार? ; नेमकं काय आहे प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
खासदार संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर 150 कोटींच्या जमिनीमुळे अडचणीत आला आहे. शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैद्राबादच्या सालारजंग कुटुंबातील वारसदाराकडून 150 कोटींची जागा गिफ्ट मिळाली आहे. ही जागा संदिपान भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट कशी मिळाली? याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून  खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरची चौकशी केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील दाऊदपुरा परिसरातील 150 कोटींच्या तीन एकर जागेची चौकशी सुरू आहे. ही तीन एकर जागा मूळ हैद्राबादच्या सालारजंग कुटुंबाची होती. सालारजंग कुटुंब हे हैद्राबादच्या निजामाच्या सेवेत होतं. या कुटुंबाची 150 कोटींची जागा भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे.

जावेद शेख असं भुमरेंच्या ड्रायव्हरचं नाव आहे. तो मागील 12 ते 13 वर्षांपासून खासदार संदिपान भुमरे यांच्या सेवेत आहे. साधारण ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला दिडशे कोटींची जागा भेट म्हणून कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावरून संशय देखील निर्माण झालाय. भुमरेंच्या ड्रायव्हरविरोधात वकील मुजाहिद खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू केली आहे.

खासदार भुमरे यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान याप्रकरणी खासदार भुमरे यांनी ड्रायव्हरच्या व्यवहाराशी संबंध नाही, असं स्पष्ट केलं आहे. एक साधा ड्रायव्हर, ज्याला पंचवीस हजार पगार असेल. त्याला सालारजंग एवढी प्रॉपर्टी ड्रायव्हरला भेट देत असतील, तर चौकशी व्हायला हवी असं म्हटलेलं आहे.

याप्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे. ड्रायव्हरच्या जमिनीमुळे आता भुमरेंच्या अडचणी वाढणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group