राजकीय बातमी ! भाजपला मोठा धक्का, 10 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार
राजकीय बातमी ! भाजपला मोठा धक्का, 10 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार
img
Dipali Ghadwaje
राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.  विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 10 पेक्षा अधिक नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 7 जुलै रोजी संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगरमध्ये होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा प्रवेश सोहळा होणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांना भाजपने विनवण्या करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते दानवे, भाजप मंत्री अतुल सावे यांची पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी सुरू झाली आहे. पदाधिकारी मात्र भाजप सोडण्यावर ठाम असल्याचे समोर येत आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत असून भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 7 ते 8 माजी नगरसेवक व पदाधिकारी येत्या सात जुलैला शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांनी वेगवेगळ्या मतदार संघासाठी योग्य उमेदवारांचा शोध चालू केला असतानाच शिवसेना पक्षाचा गड असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरात अनेक माजी नगरसेवक व उपमहापौर, पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने खळबळ उडाली आहे.

7 जुलैला होणार पक्षप्रवेश सोहळा

उद्धव ठाकरे देणार संभाजीनगर भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या सात जुलैला भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. हा प्रवेश म्हणजे मंत्री अतुल सावे यांना मोठा राजकीय धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

विशेष म्हणजे या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाठ यांची अडचण वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील एका नगरसेवकाने गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली होती.
 
 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group