बर्थडे दिवशीच बड्या शिवसेना नेत्याच्या लेकीचा मृत्यू , नेमकं काय घडलं ?
बर्थडे दिवशीच बड्या शिवसेना नेत्याच्या लेकीचा मृत्यू , नेमकं काय घडलं ?
img
वैष्णवी सांगळे
नववर्षाचे स्वागत आणि स्वत:चा २२ वा वाढदिवस करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना नेत्याच्या मुलीचा गॅस गिझरमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुनमून चितवन असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती पंजाबमधील शिवसेना (उत्तर भारत) प्रमुख दीपक कंबोज यांची कन्या होती. ज्या घरात मुलीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू होती, तिथेच आता रडारड आणि मातम पसरलं आहे. जालंधरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दीपक कंबोज हे पंजाबमधील शिवसेनेचे नेते आहेत. १ जानेवारी रोजी मुनमून चितवन (वय, २२) वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच तिचा अंत झाला. मुनमुन बाथरूममध्ये अंघोळीला गेली ती परत आलीच नाही. गीजर खराब झाला आणि संपूर्ण बाथरूममध्ये धूर पसरला. त्यामुळे मुनमुन गुदमरली. तिला बाथरूममधून बाहेर पडणंही शक्य झालं नाही. 

बाथरूम बंद असल्याने आतमध्ये गॅस भरला गेला. त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास झाला. अचानक सर्व प्रकार झाल्याने बाथरूमची कडी उघडून बाहेर येण्याचंही तिला सुचलं नाही. गुदमरल्यामुळे ती बेशुद्ध पडली. गॅस इतका पसरला की बाथरूमच्या बाहेरही आला होता. घरात गॅस दिसल्याने कुटुंबीयांनी बाथरूमच्या दिशेने धाव घेतली.

यावेळी त्यांनी जोरजोरात दरवाजा वाजवला. पण मुनमुनकडून कसलाच प्रतिसाद आला नाही. तिचा आवाजही बाहेर आला नाही. त्यामुळे सर्वच जण घाबरले आणि त्यांनी दरवाजा तोडून टाकला. त्यावेळी मुनमुन त्यांना बेशुद्ध पडलेली दिसली. कुटुंबीयांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत्यूचं नेमकं कारण समजण्यासाठी पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला आहे. त्यानंतर काल दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावरच मुनमुनच्या मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group