नाशिकमध्ये ठाकरे गटा पाठोपाठ भाजपातही बंडखोरी;
नाशिकमध्ये ठाकरे गटा पाठोपाठ भाजपातही बंडखोरी; "यांनी" भरला उमेदवारी अर्ज
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- नाशिक लोकसभा मतदारसंघाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला.

महायुतीकडून गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाशिंग बांधून बसलेले दिनकर पाटील यांनी नाराज व्यक्त केली. तसेच मविआ कडून वाजेंना उमेदवारी दिल्यानंतर विजय करंजकर यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. 

ठाकरे गटात बंडखोरी करून विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. नंतर भाजपातही बंडखोरी होत इच्छुक असलेले अनिल जाधव यांनीही आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आता सर्वांच्या नजरा माघारीकडे लागल्या आहेत.

करंजकर, शांतीगिरी महाराज व जाधव हे माघार घेतात की निवडणूक लढवण्यावर ठाम राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group