माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत १२ वर्षांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावंत होते. त्यांनी विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व केले होते. दरम्यानच्या काळात ते मनसेत सक्रिय होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसे चा राजीनामा दिला होता.
उपरकर यांनी शिवबंधन बांधले त्यावेळी आ. मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संजय पडते, संग्राम प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.
उपरकर यांच्यासह त्यांचे समर्थक आशिष सुभेदार, बाबल गावडे, दीपक गावडे, अप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, विनोद सांडव, नाना सावंत आबा चिपकर, शैलेश मयेकर, मंदार नाईक, अभय देसाई, प्रकाश साटेलकर, सुरेंद्र कोठावळे, मनोज कांबळी, यांनीही ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.