सध्या राजकारणातील घाडामोडींना वेग आला असून सध्या ठाकरे गटात अनेक राजकीय भूकंप सुरु असून,एकीकडे शिवसेना पक्ष व चिन्ह यावरून कोर्टात सुनावणी सुरु असून दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांची यांचिक फेटाळली आहे. त्यामुळे आता विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलावर आहे. पालघरच्या जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होत, त्यावर आता मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शिववसेना ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांना अखेर दिलासा मिळालाच नाही. मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांची याचिका फेटाळून लावली आहे. पालघरच्या जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होतं. जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर मुंबई महानगर पालिकेने राज्य सरकारला पत्र लिहित नगरसेवक पद रद्द झाल्याच जाहीर करायला सांगितलं होतं, त्यामुळे विशाखा राऊत यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र पालिकेच्या या पत्रव्यवहाराला विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल होतं, मात्र त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. राऊत यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे, त्यामुळे आता विशाखा राऊत यांच्या अडचणी वाढल्या असून, त्याचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे.