उद्धव ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी यादी जाहीर
उद्धव ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी यादी जाहीर
img
Nandini khandare More
राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आलं आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहे. महाराष्ट्रातील ५ जागांवर ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. रविवारी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ आता शिवसेना ठाकरे गटाने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरेसेनेने आपले २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी २ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमधून दोघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी दत्तात्रय लहानेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर पदवीधरसाठी दिलीप घुगेंना संधी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसनंही अमरावतीच्या जागेसाठी उमेदवार घोषित केल्यानं मविआत बिघाडी पाहायला मिळत आहे. अमरावतीमध्ये आधीपासूनच ठाकरेसेने आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. आता दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले आहेत.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती ऋषिकेश पोहरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिलीप कडू यांच्या नामांकन अर्ज दाखल करताना आमदार संजय खोडके, सुलभा खोडके हे देखील उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group