नाशिक लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर हे आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
करंजकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरुन मेळावा घेत लढणार व नडणार असा इशारा दिला होता. दरम्यान, आज ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते. उद्या माघारीची अंतिम मुदत असल्याने बंडखोरांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांपासून तर सामान्य कार्यकर्तेही कामाला लागले आहे.
शिंदे गटाचे विद्यमान जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची उपनेतेपदी नियुक्ती झाल्याने प्रवेश करताच विजय करंजकर यांची जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.