विधानसभा निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंना धक्का;
विधानसभा निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंना धक्का; "या" नेत्याने पक्षाला केला जय महाराष्ट्र
img
दैनिक भ्रमर

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का बसला आहे.

पूर्व विदर्भातील महिला नेत्या शिल्पा बोडखे यांनी राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र केले आहे. फेब्रुवारी महिन्यांतच त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना समर्थन दिले होते. शिवसनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्याबरोबर झालेला वाद आणि मित्र पक्षातील भूमिका यांमुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकला असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये सांगितलं. 

त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूप छान काम करत होते. त्यांच्या कामाला प्रभावित होऊन मी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून बाहेर पडले. तिथून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेतच राहण्याचा विचार मी केला म्हणून शिंदेंना साथ दिली. विकासाच्या दृष्टीकोनातून त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. महायुती सरकार हिंदुत्त्वावर चालत आहे.

परंतु, मित्रपक्षात असलेले वाचाळवीर धर्माच्या नावाने धार्मिक तेढ निर्माण होईल, द्वेष पसरेल असं बोलतात. दुसऱ्या समाजाला बोलून त्यांचं मन दुखावण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे. हे माझ्या विचारधारेला पटणारं नाही. मी तेव्हाही त्यांचं समर्थन केलं नाही. यापुढेही करणार नाही. आपलं हिंदुत्त्व काय आहे, असं मला एकनाथ शिंदेंना विचारायचं आहे. आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालतो.”

“येथे कष्ट करणाऱ्या, प्रामाणिक काम करणाऱ्याला महत्त्व नाहीय अशी टीकाही शिल्पा बोडखे यांनी केली.

पहा त्यांनी काय म्हटले आहे ट्विट मध्ये

https://x.com/BodkheShilpa/status/1846455690925117811?s=19

इतर बातम्या
Join Whatsapp Group