भाजपाला धक्का ! ८ नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
भाजपाला धक्का ! ८ नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
img
वैष्णवी सांगळे
भाजपच्या ८ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीत हा धक्का भाजपाला बसला आहे. नगरपंचायतीतील १७ सदस्यांपैकी भाजप परिवर्तन पॅनलमधील तब्बल ८ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशामुळे मुरबाडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीने आणि जनसंपर्काने प्रेरित होऊन हा निर्णय घेतल्याचे तसेच भाजपकडून जाणूनबुजून कामे डांबवले जाणे, विकासकामांसाठी निधी न देणे यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली असून, शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या निर्णयामुळे मुरबाडमधील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला असून, आगामी काळातील राजकारणावर त्याचा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भिवंडीतील पडघा येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष रामभाऊ भगवान दुधाळे, उपनगराध्यक्षा दीक्षिता विकास वारघडे, गटनेते मोहन भालचंद्र गडगे, बांधकाम सभापती उर्मिला सुजित ठाकरे, पाणीपुरवठा सभापती स्नेहा सागर आंबवणे, नगरसेविका नम्रता नंदकुमार जाधव, रविना विनायक राव, अनिता संतोष मारके, तसेच इतर कार्यकर्ते विकास वारघडे, सुजित ठाकरे आणि नंदकुमार जाधव यांच्यासह अनेकांनी शिवसेना शिंदे गटात समावेश केला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group