एकनाथ शिंदे आणि  अजित पवारांची डोकेदुखी वाढणार ;
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची डोकेदुखी वाढणार ; "हे" आहे कारण
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्रात महायुतीतील कुरबुरी वाढू लागल्या आहेत. विधानसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे नेते आपआपल्या अपेक्षा जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८० ते ९० जागांची मागणी केली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही १०० जागा मिळाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

मात्र मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने महायुतीत आता आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलेलं दिसत आहे. कारण काल केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील भाजप नेत्यांनी आपण विधानसभेला कमीत कमी १८० जागा लढायला हव्यात, अशी आग्रही मागणी केल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला चांगलं यश मिळवायचं असेल तर महायुतीत आपल्या वाट्याला कमीत कमी १८० जागा यायला हव्यात, असा सूर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत आळवल्याची माहिती आहे. तसंच शिंदेंच्या शिवसेनेला ६० ते ७० जागा दिल्या जाव्यात आणि उर्वरित जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात याव्यात, असंही या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांना कळवल्याचं बोललं जात आहे. याबाबतच वृत्त एका मराठी वृत्त संस्थेने दिलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group