अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर  माजी उपमुख्यमंत्र्यावर गोळीबार ; आरोपीला अटक
अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर माजी उपमुख्यमंत्र्यावर गोळीबार ; आरोपीला अटक
img
Dipali Ghadwaje
पंजाबमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर बुधवारी जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या आवारात प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान या हल्ल्यातून ते सुखरुप बचावले आहेत.  घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. सुखबीर सिंग बादल यांच्यासह एसएडी नेते 2 डिसेंबर पासून, श्री अकाल तख्त साहिबने त्यांना दिलेल्या धार्मिक शिक्षेअंतर्गत 'सेवा' देत आहेत. यावेळी एका वयस्कर इसमाने सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार केला. 
 
माजी उपमुख्य मंत्र्यांवर अमृतसर येथे झालेल्या या हल्ल्यानंतर शिरोमणी अकाली दलाने पुरेशी सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंजाब सरकारवर जोरदार टीका केली. 

एसएडी नेत्यांनी राज्य प्रशासनावर ढिसाळ सुरक्षेबाबत टीकास्त्र सोडतानाच या हल्ल्यास कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित केला. पक्षाने याबाबत एक अधिकृत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. 


सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या माहिती देताना, अतिरिक्त पोलीस उपायुक्त हर्पाल सिंग यांनी खुलासा केला की आरोपी चुआरा एक दिवस आधी मंदिरात आला होता. बुधवारी सकाळी, चुआरा नेहमीप्रमाणे आला, त्याने प्रार्थना केली आणि नंतर त्यांने बादल यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. एडीसीपी सिंग यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, मंदिरात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मी सकाळी 7:00 वाजल्यापासून वैयक्तिकरित्या घटनास्थळी उपस्थित होतो.

मोठी बातमी! राज्यात "या" ठिकणी भूकंपाचे धक्के, पहाटे पहाटे जमीन हादरली

नेमकं काय आहे प्रकरण?

बादल हे अकाल तख्ताने लादलेली धार्मिक शिक्षा पूर्ण करत असताना हा हल्ला झाला. 2015 मध्ये गुरु ग्रंथ साहिबच्या अपवित्रतेच्या घटनेदरम्यान डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पाठिंबा दिल्याबद्दल अकाली दलाचे नेते दोषी आढळले होते. शिक्षेचा एक भाग म्हणून, बादल यांना दररोज एक तास मंदिरात 'सेवक' (स्वयंसेवक) म्हणून काम करावे लागत असे.  

दरम्यान या हल्ल्यामुळे पंजाबमध्ये तणाव वाढला असून, सार्वजनिक व्यक्तींची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या क्षमतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असली तरी ही घटना धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी कडक सुरक्षा उपायांची गरज अधोरेखित करते आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group