लढणार म्हणजे लढणार, आणि चांगल्या चांगल्यांना पाडणार - विजय करंजकर
लढणार म्हणजे लढणार, आणि चांगल्या चांगल्यांना पाडणार - विजय करंजकर
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- लढणार म्हणजे लढणार, आणि चांगल्या चांगल्यांना पाडणार, असा इशारा देत शिवसेना (उठबा) गटाचे विजय करंजकर यांनी लोकसभेत बंडखोरी करण्याचे संकेत बोलून दाखवले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र आज सकाळी करंजकर यांच्या ऐवजी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर दुपारी करंजकर यांनी पत्रकार परिषद घेतली. तिथे त्यांनी शक्ती प्रदर्शन केले.

  गेल्या 13 वर्षापासून जिल्हा प्रमुख म्हणून काम केले. या काळात जिल्हापरिषद, मनपा, ग्रामपंचायत अश्या अनेक निवडणुकीत प्रामाणिक काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम केले. कोणाचा चहा पण न घेता तिकीट दिले. त्या मुळे लोकसभा मतदार संघातील सर्व तालुके, गावे येथे संपर्क होता आणि आहे. 2014 व मागील लोकसभा निवडणुकीत इच्छुक होतो मात्र पक्षाने थांबावले व थांबलो.

पक्ष फुटी नंतर मी अनेक पदाधिकारी, शिवसैनिक यांना थांबवले. एकनिष्ठ राहिलो. त्याचे फलित म्हणून एक वर्षांपूर्वी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी बाबत हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे वर्षभर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. नुकत्याच झालेल्या शिवसेना अधिवेशनात पक्ष प्रमुख ठाकरे व नेते संजय राऊत यांनी माझ्या नावाची घोषणा केली.

काल पर्यंत माझे नाव निश्चित होते मात्र आज सकाळी माझे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मी गद्दार नाही खुद्दार आहे असे सांगत दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना भेटून निर्णय बदलू. मात्र तसे न झाल्यास लढणार म्हणजे लढणार, आणि चांगल्या चांगल्या ना पाडणार, असा इशारा करंजकर यांनी दिला. यावेळी माजी आमदार योगेश घोलप, अनिता करंजकर, संजय तुंगार, नितीन चिडे, राजाभाऊ गायधनी आदि सह शिवसैनिक उपस्थित होते. 

लोकसभा निवडणूकित करंजकर बंडखोरी करणार की सेना नेते त्यांना शांत करणार, हे आत्ता येणारी वेळ ठरवेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group