सोलापूर : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोपी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
सोलापुरात दोन दिवस आधी दंगली लावणार होते. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे. रक्ताने राजकारण करतात ही लोकं, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत फडणवीसांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता. त्यासाठी निवडणुकीआधी 2 दिवस सोलापुरात दंगली घडवल्या जाणार होत्या, असा आरोप प्रणिती शिंदेंनी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात त्या बोलत होत्या. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं असं प्रणिती म्हणाल्या.