व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई; राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई; राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरु असल्याची माहिती आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी जावून कारवाई सुरु केली. दरम्यान गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारवाई रोखण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस महिला अधिकाऱ्याला फोनवरुन चांगलाच दम भरला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मुरुम उपसा करणाऱ्यांचं अजित पवार समर्थन करतात, प्रशासकीय कारवाईत अडथळा आणणात, असा सवाल अनेकांनी विचारला. तसेच यावर विरोधी पक्षातील अनेकांनी अजित पवारांच्या कृतीवर आक्षेप घेतला, त्यांच्यावर टीका केली.

उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला, वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा; ... तर मी अ‍ॅक्शन घेईन , दादा महिला अधिकाऱ्यावर भडकले

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे आणि शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करणे यामुळे राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी कुर्डूतील १५ ते २० ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणि बेकायदा मुरूम उपसाप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group