राजकीय बातमी : ठाकरेंची ताकद वाढणार..! बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार?
राजकीय बातमी : ठाकरेंची ताकद वाढणार..! बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे.  एकीकडे भाजपचे काही नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील ठाकरे गटात येण्यात इच्छुक असल्याचं कळतंय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागेश वनकळसे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच ठाकरे गट किंवा शरद पवार गटात प्रवेश करणार, अशा चर्चा रंगल्या आहेत.

नागेश वनकळसे हे शिवसेना शिंदे गटाचे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत.  मोहोळ विधानसभा मतदारसंघातून नागेश वनकळसे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2019 च्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या पाठिंब्याने येथे यशवंत माने यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर यशवंत माने हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार पर्यायी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे युतीधर्मामुळे या जागेवरुन उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने शिंदे गटाचे नागेश वनकळसे नाराज झाले आहेत. मी कुठल्याही परिस्थिती आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार, असा निर्धारच वनकळसे यांनी केला आहे. 

नागेश वनकळसे यांची मोहोळमध्ये मोठी ताकद आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय पदाधिकारी राहिले आहेत. अभ्युदय मल्टिस्टेट बँकेचे प्रमुख आणि माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी वनकळसे यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी ताकद लावली, त्यामुळे वनकळसे धनुष्यबाण सोडून हाती मशाल किंवा तुतारी घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नक्की वाचा >>>> अजितदादांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल ; म्हणाले चार दिवस सासूचे तसेच चार दिवस....
इतर बातम्या
Join Whatsapp Group