घरचा आहेर ! विशेष अधिवेशन बोलवा; मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार आक्रमक
घरचा आहेर ! विशेष अधिवेशन बोलवा; मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार आक्रमक
img
वैष्णवी सांगळे
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात विशेषतः मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्वात लक्षवेधी मराठा आरक्षण आंदोलनास सुरुवात झाली. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानात हे आंदोलन सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते मंडळी पुढे येत असून आमदार-खासदारही सहभागी होऊन भूमिका मांडत आहेत. 

मुंबईत भगवं वादळ ! मनोज जरांगेंना कोणकोणत्या नेत्याने दिला पाठिंबा ? वाचा

पण भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडून जाहीरपणे कोणीही पुढे आले नव्हते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळेवढ्याचे भाजप आमदार समाधान आवताडे हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, त्यामुळे स्वपक्षाच्या आमदाराची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य करणार का? अशी चर्चा रंगली आहे.

वातावरण तापणार ! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा, मनोज जरांगेंना थेट इशारा

सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. सकल मराठा समाजास आरक्षण मिळणेकरीता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी आमदार आवताडे यांनी केलीय. राज्याचे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून आरक्षणाच्या प्रश्नावर थेट भूमिका त्यांनी घेतली. 
< >



इतर बातम्या
Join Whatsapp Group