मनपा आरोग्याधिकाऱ्याच्या विरोधात प्रहारच चिखलात झोपून आंदोलन
मनपा आरोग्याधिकाऱ्याच्या विरोधात प्रहारच चिखलात झोपून आंदोलन
img
DB
सोलापूर : प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांची महापालिका आरोग्यधिकाऱ्याने दिशाभूल केली. याचा निषेध म्हणून आज प्रहार जनशक्तीच्यावतीने चिखलात झोपून आंदोलन केले. यावेळी महापालिकेचा निषेध देखील करण्यात आला. 

दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे कांही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडून बच्चू कडू यांची दिशाभूल करत दिव्यांगांच्या फिजिओथेरपी सेंटरला घेऊन न जाता दुसऱ्याच ठिकाणचे सेंटर दाखवल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. याचा निषेध करत आज प्रहार कडून मनपाच्या धुळखात पडून असलेल्या फिजिओथेरपी सेंटर समोरील चिखलात झोपून आंदोलन करण्यात आलं आहे.
 
तसेच मागच्या कित्येक महिन्यांपासून महापालिकेच फिजिओथेरपी सेंटर बंद आहे. त्यामुळे असंख्य दिव्यांग बांधवांची गैरसोय होत असल्याचा आरोप प्रहार कडून करण्यात आला आहे. 

त्यामुळे संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा त्यांच तोंड काळ करण्याचा इशारा प्रहारकडून देण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group