धक्कादायक ! पत्नीच्या हत्येच्या आरोपात पती अटक, महिला आढळली प्रियकरासोबत जिवंत
धक्कादायक ! पत्नीच्या हत्येच्या आरोपात पती अटक, महिला आढळली प्रियकरासोबत जिवंत
img
दैनिक भ्रमर
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपात पती अटकेत होता ती चक्क जिवंत आढळली आहे. 
काही दिवसांपूर्वी पाटकळ गावातील एका कडब्याच्या गंजीला आग लागली होती. त्यात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले होते. पत्नीला मारून तिचा मृतदेह जाळल्याचा आरोप त्याच्यावर होता. पण या प्रकरणात आता भलताच ट्विस्ट आला आहे. ज्या महिलेला जाळून मारल्याचा आरोप करण्यात आला होता. ती महिला जिवंत आढळली आहे.

14 जुलै रोजी पहाटे किरण नावाच्या महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याचा फोन तिच्या वडिलांना आला होता. किरणचे चुलत सासरे दत्तात्रेय सावंत यांनी हा फोन केला होता. हा फोन येताच किरणचे कुटुंब पाटकळला तातडीने पोहोचले. घरासमोर कडब्याची गंजी जळाली होती आणि त्यात एका महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. किरणचा नवरा नागेश सावंत रडत होता आणि किरणने स्वतःला पेटवून घेतल्याचं तो सांगत होता. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले. मात्र, काही दिवसांनी पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ज्या किरणचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात होतं, ती चक्क जिवंत असून सातारा जिल्ह्यातील कराड इथे एका व्यक्तीसोबत सापडली आहे.

आता पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, कराडमध्ये सापडलेला व्यक्ती किरणचा प्रियकर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी किरणने दुसऱ्या एका महिलेचा मृतदेह आपल्या घरासमोर आणून जाळला आणि स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला असावा.  पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group