धक्कादायक ! झोपताना एक चूक पडली महागात; 2 चिमुरड्यांचा मृत्यू
धक्कादायक ! झोपताना एक चूक पडली महागात; 2 चिमुरड्यांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
सोलापुरातुन एक खळबळजनक बातमजी समोर आली आहे. एका छोट्या चुकीमुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना याठिकाणी समोर आली आहे. 

गवंडी काम करणारे युवराज मोहन सिंह बलरामवाले पत्नी रंजना आई विमल आणि दोन मुलं हर्ष आणि अक्षरासोबत सोलापूरातील लष्कर परिसरातील बेडर फुलजवळ राहतात. दोन दिवसांपूर्वी युवराज मोहन सिंह बलरामवाले यांचे कुटुंबीय तिरुपतीच्या दर्शनासाठी गेले होते. काल 31 ऑगस्टला त्यांच्या घरी नातेवाईक आले होते. सर्वांना त्यांनी तिरुपतीचा प्रसाद वाटला. यानंतर ते झोपी गेले. 

नाशिक : खळबळजनक ! आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न

रात्री झोपताना त्यांनी गॅस व्यवस्थित बंद केला नव्हता. त्याचे घर दहा बाय पाच आणि हवा बंद खोलीत पाच जणांचं कुटुंब झोपलं होते. रात्रभर गॅस गळतीतून 5 जणांचा श्वास गुदमरल्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध प्राथमिक झालं होतं. सकाळी ११ वाजले तरी त्यांनी खोलीचं दार न उघडल्याने नातेवाईकांनी घराचं दार उघडलं तर आत गॅसचा वास येत होता. याशिवाय पाचही जणांच्या तोंडातून फेस येत होता. हे पाहताच पाचही जणांना तातडीने रुग्णालात दाखल करण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. 

धक्कादायक ! पती- पत्नीच्या वादात घडले भयंकर; पत्नीला राग अनावर होताच केले असे काही की...

दुर्घटनेत युवराज मोहन सिंग बलरामवाले (40), रंजना युवराज बलरामवाले (35), विमल मोहन सिंग बलरामवाले (60) यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर हर्ष बलरामवाले (6), अक्षरा बलरामवाले(4) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ  व्यक्त आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group