आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर शहरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण ताजे असतानाच आणखी एका शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण झाले असून, तो भाड्याच्या घरात राहत होता.
मात्र, त्याच ठिकाणी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.