नव्या वर्षात देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ,भीषण अपघात  ४ जणांचा जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना ?
नव्या वर्षात देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ,भीषण अपघात ४ जणांचा जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना ?
img
Dipali Ghadwaje
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे  राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान  नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकजणांनी मंदिरात जाणं पसंत केले. अशातच नव्या वर्षात देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातलाय. सोलापूरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याचे समजतेय.

मिळालेल्या माहितीनुसार , जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.  स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेय.

गणगापूरला जात असताना मैंदर्गीजवळ अपघात झाल्याचे समजतेय. मृत हे नांदेड जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातलाय.

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जातं असताना मैंदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील आहेत. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात करण्यात दाखल आले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group