सोलापूरमधील मंगळवेढ्यातील घटना एखाद्या चित्रपटाला लाजवणारही आहे. लव्ह , मर्डर अँड सस्पेन्स अशी चित्रपटाला शोभावी अशी घटना घडली आहे. मंगळवेढ्यातील तरुणाने वहिनीला फक्त पळवूनच नेले नाही तर दुसऱ्या महिलेचा खून देखील केला आहे .
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ गावामध्ये फिल्टी गावातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहित किरण सावंत व तिचा चुलत दीर निशांत सावंत यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध होता, त्यामुळे पळून जायचा प्लॅन दोघांनी आखला. धक्कादायक म्हणजे निशांत याने एका मनोरूग्ण महिलेला पळवून गावात आणलं. १४ जुलै रोजी पहाटे सुमारास किरण सावंत हिच्या आत्महत्या बनाव करण्यासाठी कडब्याच्या गंजीत मनोरुग्ण महिलेला पेटवून दिले. त्यानंतर प्रियकर निशांत यानेच किरण हिने पेटवून घेतल्याचे कांगावा करत आरडाओरड केली.
याप्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने करत पोलिसांनी किरणच्या मोबाईलचा सीडीआर तपासला असता ती कराडच्या जवळ असल्याचे समोर आले. पोलिसांना शंका आल्याने प्रियकर निशांत सावंत याला किरणच्या मोबाईलवर व्हीडिओ कॉल करायला लावला, तो कॉल किरण हिने उचलला. इथेच दोघांचा भंडाफोड झाला. त्यानंतर किरण सावंत ही विवाहित महिला जिवंत असल्याचे समोर आले, त्यानंतर पोलिसांनी कराड येथून संशयित आरोपी किरण सावंत हिला ताब्यात घेतले.
पोलीस तपासामध्ये आरोपी निशांत सावंत यांनीच प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव करण्यासाठी एका मनोरुग्ण महिलेला कडब्याच्या गंजीत ठेवून जाळल्याची कबुली दिली आहे. आता जाळण्यात आलेली मनोरूग्ण महिला कोण आहे? याचा पोलिस शोध घेत आहेत.