सरकारची कोंडी ! राज्यात आणखी एक आंदोलन पेटणार, 'या' नेत्यानं घेतला मोठा निर्णय
सरकारची कोंडी ! राज्यात आणखी एक आंदोलन पेटणार, 'या' नेत्यानं घेतला मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, म्हणून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनामुळे सरकारची मोठी कोंडी झाली असताना राज्यात आणखी एका आंदोलनानं वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

नाशिक : वकिलाच्या घरातून 23 तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी ; परिसरात खळबळ

शेतकरी नेते आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठा निर्णय घेतला आहे, आजपासून बच्चू कडू हे राज्यभरात शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा काढणार आहेत. आज वाशिम जिल्ह्यातून या हक्क यात्रेचा शुभारंभ होणार आहे. बच्चू कडू रोज प्रत्येक जिल्ह्यात ५ ते ६ सभा घेणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे, ते आपल्या मागणीवर ठाम असून, आता संपूर्ण राज्यात बच्चू कडू सभा घेणार आहेत.

भीषण अपघात ! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू

शेतकऱ्यांसाठी लढलो तर मत मिळत नाहीत, शेतकरी आंदोलनात येत नाहीत, असं एका मोठ्या नेत्याने आम्हाला म्हटलं, पण शेतकऱ्यावर आमचा विश्वास आहे, शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होतील, अशी प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडू यांनी दिली आहे. दरम्यान या आंदोलनामुळे आता सरकारच्या कोंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group