"सचिन तेंडुलकरच्या गेमिंग जाहिरातीमुळेच.......", बच्चू कडू पुन्हा आक्रमक
img
Dipali Ghadwaje
मुंबई : माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात बंद करावी, अन्यथा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा, अशी मागणी करत बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली होती. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. याच प्रकरणावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यादिनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

" जो अंगरक्षक सचिन तेंडुलकर यांचे रक्षण करत होता. त्यांना इजा होऊ नये म्हणून काम करत होता. त्यालाच सचिन करत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला. हे दुर्दैवी आहे, सचिन तेंडुलकरने याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच सचिनने भारतरत्न परत करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होईल ते बघणं महत्वाचं ठरेल 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group