सचिन तेंडुलकरविरोधात बच्चू कडू आक्रमक; दानपेटी घेऊन घराबाहेर आंदोलन!
सचिन तेंडुलकरविरोधात बच्चू कडू आक्रमक; दानपेटी घेऊन घराबाहेर आंदोलन!
img
Dipali Ghadwaje
सचिन तेंडुलकरच्या ऑनलाइन गेमच्या जाहीरातीवरुन पुन्हा एकदा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.  ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरात प्रकरणी  प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी अखेर सचिन तेंडूलकरच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान गुरूवार( 31, ऑगस्ट) ला त्यांनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन सुरू केले असून आंदोलकांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरच्या ऑनलाईन गेमिंग जाहिरातीविरोधात आक्षेप नोंदवला होता. 

अशा जाहिराती न करण्याचे सांगत घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिली होता. त्यानंतर आज (३१, ऑगस्ट) बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरच्या घरासमोर भीक मांगो आंदोलन सुरू केले. 

सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर बच्चू कडूंसह त्यांचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले आहेत. सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमची जाहीरात करु नये, असं बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. आंदोलनासाठी आलेल्या बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखलं आहे. पोलिसांनी तात्काळ आंदोलनस्थळी  बच्चू कडू यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले आहे. तसेच घराबाहेरही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी बच्चू कडू यांनी या जाहिरातींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही पत्र लिहले होते. या पत्रामध्ये त्यांनी सचिन तेंडुलकर हे भारतरत्न असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या जाहिरातींचा परिणाम तरुणाईवर होत आहे. या जुगाराच्या जाहिरातींना महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांची कुटूंबे उध्वस्त होत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group