दैनिक भ्रमर : फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंबच चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. त्यामागचं कारण म्हणजे सचिनचा लाडका लेक, अर्जुन तेंडुलकर याचा झालेला साखरपुडा. आता अन्जली तेंडुलकरने एक मोठा निर्णय घेतला आहे.
लेकाच्या लग्नाच्या धामधुमीत सचिन तेंडुलकर याची पत्नी आणि 'वरमाय' अंजली तेंडुलकर हिने नवीन गृहखरेदी केली आहे. Zapkey.com ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार मुंबईजवळील विरारमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकरने मुंबईजवळच्या विरारमध्ये घर विकत घेतलं आहे. अंजली तेंडुलकरने विरारमधील पेनिन्सुला हाईट्स नावाच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर 32 लाख रुपये किंमतीला हे घर विकत घेतलं आहे.
हे ही वाचा...
घरासाठी 1.92 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. 391 चौरस फूट आकाराचे हे अपार्टमेंट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. कागदपत्रांनुसार, हा व्यवहार 30 मे 2025 रोजी नोंदणीकृत झाला होता. महिला घर खरेदीदार म्हणून, अंजली तेंडुलकर यांनी स्टॅम्प ड्युटीवर 1% सवलतीचा लाभ घेतला. महाराष्ट्रात, महिला घरमालकांना या लाभाचा लाभ मिळतो, राज्यात शहर आणि जिल्ह्यानुसार स्टॅम्प ड्युटी दर 5% ते 7% दरम्यान असतात.