'अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठणे अतुलनीय; अफगाणिस्तानच्या विजयावर सचिन तेंडुलकरने केले अभिनंदन
'अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठणे अतुलनीय; अफगाणिस्तानच्या विजयावर सचिन तेंडुलकरने केले अभिनंदन
img
Jayshri Rajesh
दिग्गजांना पराभूत करून T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या या कामगिरीने अफगाणिस्तान जल्लोषात आहे.  आनंद व्यक्त करण्यासाठी अफगाणिनी लोक रस्त्यावर आले आहेत. अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सुपर एट सामन्यात आठ धावांनी विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यावेळी पावसाचा खेळ सुरू होता. यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघालाही स्पर्धेतून घरी पाठवले आहे. याआधी त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता.

नवीन उल हकने मुस्तफिजुर रहमानला एलबीडब्ल्यू आऊट करताच खोस्त, पक्तिया आणि काबूलमध्ये मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमा होऊ लागले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या शहरांची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. 'आमच्यासाठी यश म्हणजे काय ते पाहा' असे कॅप्शन दिले आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये हजारो चाहते रस्त्यावर, त्यांच्या घराच्या बाल्कनीत आणि दुकानांच्या छतावर उत्सव साजरा करताना दिसले. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'T20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या नायकांचा विजय कसा साजरा करायचा हे त्यांना माहीत आहे.
 सचिन तेंडुलकरने केले अफगाणिस्तानचे अभिनंदन 

चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने अफगाणिस्तानच्या यशाचे कौतुक करताना लिहिले, 'अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठणे अतुलनीय आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत केले. हा विजय तुमच्या जिद्द आणि मेहनतीचे फळ आहे. तुमच्या प्रगतीचा अभिमान वाटतो. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी याने संघाचे अभिनंदन केले आणि म्हटले, 'किती छान सामना झाला. अफगाणिस्तान संघाचे अभिनंदन.


आता 27 जून रोजी उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group