टी २० विश्वचषकचा स्टार फलंदाज रिंकु सिंह झाला करोडपती !
टी २० विश्वचषकचा स्टार फलंदाज रिंकु सिंह झाला करोडपती !
img
Jayshri Rajesh
भारतीय टीमचे स्टार फलंदाज म्हणून रिंकु सिंह यांची ओळख आहे. टी २० विश्वचषक मध्ये रिंकु सिंहला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते. पण भारतीय टीम टी २० जिंकल्यानंतर रिंकु सिंहने आयपीएल पेक्षाही जास्त कमाई केली आहे त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टी २० च्या वेळी जेव्हा विश्वचषक सामन्याबद्दल रिंकु सिंह याला विचारले गेले तेव्हा रिंकु म्हणाला "मी जरी खेळत नसलो तरी टीम इंडिया विश्वविजेता बनावी आणि टी २० ची ट्रॉफी भारतात आणावी. टीम सोबत जाणार आणि विश्वचषक घेवून येणार" असे विधान रिंकु सिंह यांनी पत्रकरांना दिले होते,आणि अगदी तसेच झाले टीम इंडिया जिंकली आणि रिंकुने फोटो पोस्ट करत कॅप्शन सुद्धा दिले 'बोलो होता ना ट्रॉफी सोबत आणणार'..

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने विश्वचषक जिंकणाऱ्या टीमसहीत कोंचिग स्टाफ, सपोर्ट स्टाफ आणि निवडून आलेले खेळाडू सगळ्यांना १२५ करोड रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. रिपोर्टसनुसार राखीव खेळाडूंना सुद्धा ही रक्कम देण्यात येणार आहे.

यामध्ये शुभमन गिल, खलील अहमद, आवेश खान आणि रिंकु सिंह यांचा समावेश आहे. राखीवमध्ये असणाऱ्या सर्व खेळाडूंना एक एक करोड रुपयांची रक्कम देण्यात येईल असे सूत्राकडून कळते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group