इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात झाली असून दररोज यात रोमांचक क्रिकेट सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. असे असतानाच भारतीय क्रिकेट चाहत्यांना बीसीसीआयकडून भारतीय खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट येण्याची प्रतीक्षा होती.
परंतु यादरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली असून यात 23 खेळाडूंचा समावेश आहे. यात सॅम कोंस्टास सह 3 नव्या खेळाडूंना पहिल्यांदाच या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान देण्यात आली आहे.
मंगळवार 1 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील खेळाडूंची नाव जाहीर केली. 2025-26 वर्षासाठी ऑस्ट्रेलियाने 23 खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट केलं आहे.
क्रिकेट बोर्डाने सॅम कॉन्स्टास, मॅट कुहनेमन आणि बीयू वेबस्टर या नव्या खेळाडूंचा कराराच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये या खेळाडूंचा समावेश :
जेवियर बार्टलेट, स्कॉट बोलॅंड, एलेक्स कॅरी, पॅट कमिंस, नाथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेज़लवुड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोंटास, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, लांस मॉरिस, झाई रिचर्डसन, माट शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर, एडम ज़म्पा