डॉक्टरांनी सांगितलं 12 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही, अन आता आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा ठरला 'हा' खेळाडू
डॉक्टरांनी सांगितलं 12 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही, अन आता आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा ठरला 'हा' खेळाडू
img
वैष्णवी सांगळे
कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कॅमरून ग्रीनला खरेदी करण्यासाठी तब्बल 25.20 कोटी रुपये खर्च केले. आयपीएल ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंच्या नशिबाचे दरवाजे उघडतात, मात्र ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरून ग्रीनची गोष्ट थोडी वेगळी आणि प्रेरणादायी आहे. या लिलावात ग्रीनने मिचेल स्टार्कचा विक्रम मोडीत काढत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.

आज ज्या कॅमरून ग्रीनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तो जगणार की नाही? अशी भीती व्यक्त केली जात होती.  खुद्द ग्रीनने डिसेंबर 2023 मध्ये एका मुलाखतीदरम्यान आपल्या गंभीर आजाराचा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, त्याला किडनीचा एक आजार म्हणजेच 'क्रोनिक किडनी डिसीज' आहे. हा आजार त्याला जन्मजात असून त्या वेळी डॉक्टरांनी अत्यंत भीतीदायक भाकीत केले होते.

ग्रीनच्या म्हणण्यानुसार, तो जेव्हा लहान होता तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितले होते की, तो 12 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही. ज्या वयात मुले खेळायला शिकतात, त्याच वयात ग्रीन मृत्यूशी झुंज देण्याबाबत ऐकत होता. मात्र, या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रीनने केवळ आपले आयुष्यच सावरले नाही, तर तो आज जगातील एक सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group