चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदावरून काही महिन्यांआधी खुप राडा बघायला मिळाला होता. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला होता की, आशिया कप 2023 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतले. पण आता अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदाचे अधिकार पाकिस्तानला मिळाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ने शुक्रवारी (15 डिसेंबर) दुबई येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सोबत करार केला आहे.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या होस्टिंग अधिकारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये किंवा अन्य कुठल्यातरी देशात होऊ शकतो या अटकळांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
या करारावेळी आयसीसीचे जनरल कौन्सेल जोनाथन हॉल यांच्यासह पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ उपस्थित होते. 1996 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानमध्ये कोणत्याही मोठ्या ICC स्पर्धेचे आयोजन केले नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटसाठी या स्पर्धेचे आयोजन करणे ही एक महत्त्वाची संधी आहे.
त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेसाठी भारतीय संघ शेजारी देशाचा दौरा करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.