आयपीएल मिनी लिलावात 'या' खेळाडूंनी खाल्ला सर्वाधिक भाव
आयपीएल मिनी लिलावात 'या' खेळाडूंनी खाल्ला सर्वाधिक भाव
img
वैष्णवी सांगळे
आयपीएल २०२६चा मिनी लिलाव अबू धाबी येथे झाला. मिनी लिलावात विदेशी खेळाडू सर्वाधिक भाव खाऊन जातात आणि त्याप्रमाणेच घडलं देखील. त्यासाठी बीसीसीआयने १८ कोटींचा चाप लावला होता. कारण मिनी लिलावात विदेशी खेळाडू सर्वाधिक भाव खाऊन जातात. हे आतापर्यंत निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे बीसीसीआयचा हा नियम देशांतर्गत क्रिकेटच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरला. 

सावकराचा अमानुष चेहरा पाहून महाराष्ट्र हादरला, कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली

18 कोटींच्या वरची रक्कम ही प्लेयर्स वेल्फेयर फंडमध्ये जाणार आहे. मिनी लिलावात विकत घेतलेल्या खेळाडूंपेक्षा न विकलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात फलंदाजांची नावं पुकारली गेली. यात कॅमरून ग्रीनचं नाव पुकारलं गेलं. त्याच्यासाठी केकेआरने 25.20 कोटी मोजले आणि संघात घेतलं. ही मिनी लिलावातील सर्वात मोठी बोली होती. पण बीसीसीआयच्या नियमामुळे कॅमरून ग्रीनला फक्त 18 कोटी मिळणार आहेत.

आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच श्रीलंकेच्या खेळाडूने सर्वाधिक भाव खाल्ला आहे. वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानासाठी केकेआरने 18 कोटींची बोली लावली. केकेआरची ही दुसरी मोठी बोली होती. बऱ्याच खेळाडूंना रिलीज केल्यानंतर केकेआरच्या पर्समध्ये चांगले पैसे होते. त्यामुळे त्यांनी दोन खेळाडूंवर पैसे मोजले. 

फिरकीपटू रवि बिष्णोईसाठी राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक बोली लावली. त्याच्या बेस प्राईसवरून बोली सुरू झाली. रवि विष्णोईसाठी राजस्थान रॉयल्सने 7.20 कोटी रुपये मोजले आणि संघात घेतलं. आता रवींद्र जडेजासोबत फिरकीचा एक पार्टनर मिळणार आहे.

वेंकटेश अय्यरसाठीही मोठी बोली लागणार याचा अंदाज होता. त्याच्या बेस प्राईस ही 2 कोटी होती. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याच्यासाठी 7 कोटी मोजले आणि संघात घेतलं. मेगा लिलावात केकेआरने त्याच्यासाठी मोठी बोली लावली होती. मागच्या पर्वात त्याला केकेआरने 23.75 कोटी मोजले होते. पण यावेळी त्याला 7 कोटी मिळाले आहेत. 16.75 कोटींचं वेंकटेश अय्यरला नुकसान झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group