पृथ्वी शॉला मोठा धक्का ! IPL ऑक्शनमध्ये अनसोल्ड , 'हा' स्टार खेळाडूही राहिला अनसोल्ड
पृथ्वी शॉला मोठा धक्का ! IPL ऑक्शनमध्ये अनसोल्ड , 'हा' स्टार खेळाडूही राहिला अनसोल्ड
img
वैष्णवी सांगळे
२०२५ च्या मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग लागलेला पृथ्वी शॉ आणि सरफराज खान पुन्हा एकदा मिनी लिलावात मोठ्या आशेने उतरले होते. आयपीएल २०२६ चं मिनी ऑक्शन अबुधाबीमध्ये सुरु आहे. या मिनी लिलावात पृथ्वी शॉ आणि सरफराज खान दोघांच्या नावाचा समावेश हा कॅप्ड बॅटरच्या पहिल्या सेटमध्ये करण्यात आला होता.

या ऑक्शनच्या सुरुवातीलाच पृथ्वी शॉवर बोली लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पहिल्या सेशनमध्ये पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिलाय. तर आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये सरफराज खानही अनसोल्ड राहिलाय. ७५ लाखांच्या बेस प्राईसवर पृथ्वी शॉ आणि  सरफराज खान ऑक्शनमध्ये उतरले होते. मात्र कोणत्याही टीमने त्यांच्यावर बोली लावली नाही.

२०२५ साली झालेल्या मेगा ऑक्शनमध्येही पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर आता देशांतर्गत मुंबई टीममधून देखील ड्रॉप करण्यात आलं होतं. सध्या सय्यैद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने ७ डावांमध्ये 160.52 च्या स्टाईक रेटने 183 रन्स केले होते. त्यामुळे आजच्या मिनी ऑक्शनमध्ये त्याच्यावर नजर होती मात्र तो अनसोल्ड राहिलाय.

तर नुकतंच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सरफराजने उत्तम कामगिरी केली होती. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने राजस्थानविरूद्ध तुफानी इनिंग खेळली होती. यावेळी त्याने २२ चेंडूंमध्ये ७३ रन्सची खेळी केली होती. त्याने 331.82 च्या स्टाईक रेटने ७ सिक्स ६ फोर लगावले होते. मात्र आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये सरफराज खानही अनसोल्ड राहिलाय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group