RCBच्या चाहत्यांना मोठा धक्का : विराट कोहलीसह सर्व निघाले , पण पोलिसांच्या 'त्या' एका निर्णयाने सर्व.....
RCBच्या चाहत्यांना मोठा धक्का : विराट कोहलीसह सर्व निघाले , पण पोलिसांच्या 'त्या' एका निर्णयाने सर्व.....
img
Dipali Ghadwaje
18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अखेर आयपीएल 2025 चा किताब जिंकला आणि चाहत्यांचा जल्लोष शिगेला पोहोचला. संपूर्ण शहरात आनंदाचा उत्सव सुरू होता आणि संघाने मोठ्या उत्साहात विजयी परेड आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
 
विराट कोहलीसह संपूर्ण संघ या परेडसाठी सज्ज झाला होता. मात्र, एका अनपेक्षित निर्णयामुळे सर्व गणितं बिघडली. बंगळुरू पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव विजयी परेडसाठी परवानगी नाकारली, आणि त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
 
शहरातील वाहतूक, सुरक्षा यंत्रणा आणि आगामी इतर कार्यक्रम लक्षात घेता पोलिसांनी ही परेड रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईसारखी भव्य परेड आरसीबीला करता आली नाही, हे समजल्यावर अनेक चाहते निराश झाले.
 
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यासारख्या संघांनी आपल्या विजयांनंतर भव्य सेलिब्रेशन केलं होतं. पण आरसीबीच्या ऐतिहासिक विजयावर अस विरजण पडल्याचं चित्र पहायला मिळालं.
 
 विराट कोहलीसह संघातील खेळाडू विमानतळावरून थेट टीम हॉटेलमध्ये पोहोचले. सोशल मीडियावर RCB फॅन्सने यावर नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाकडे परेडसाठी दुसरा पर्याय शोधण्याची मागणी केली जात आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group