क्रिकेटचे ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक असणारे द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून दीर्घकाळ आजारी असणाऱ्या द्वारकानाथ यांची प्राणज्योत आज मालवली असून क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
मुंबईच्या लीलावती रूग्णालयामध्ये द्वारकानाथ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उत्तम लेखक आणि समीक्षक असणाऱ्या द्वारकानाथ यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि समीक्षक विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.
उद्या 12 वाजता अत्यंसंस्कार
7 फेब्रुवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांचे पार्थिव हे अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येईल. अनेक राजकीय नेत्यांनीही द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली वाहिली असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर वेगाने ही दुःखद बातमी पसरली असून सर्वच स्तरावर सध्या हळहळ व्यक्त करण्यात येतेय.