दैनिक भ्रमर : भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाला. या साखरपुड्याची काही फोटोही पुढे आली आहेत. सर्वांना प्रश्न पडलाय की, सचिन तेंडुलकर याची होणारी सुनबाई नेमकी कोण आणि काय करते. सचिनच्या सुनेचे नाव सानिया चंडोक आहे. विशेष म्हणजे दोघेही लहानपणीपासूनचे चांगले मित्र आहेत. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा पार पडला.
वडील सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणेच अर्जुन तेंडुलकर याने कमी वयात क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. क्रिकेटच्या माध्यमातून त्याने मोठी कमाई देखील केलीये. अर्जुनच्या नेटवर्थमध्ये सातत्याने वाढ होतंय. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. अर्जुन हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चंडोक मुंबईतील एका मोठ्या आणि संपन्न बिझनेस कुटुंबाशी संबंधित आहे. सानियाच अर्जुन तेंडुलकरची बहिण सारा तेंडुलकरसोबत सुद्धा खास बॉन्डिंग आहे.
सानिया चंडोक आहे तरी कोण ?
सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया चंडोक ही मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये नियुक्त भागीदार आणि संचालक आहे. सानिया चंडोक Graviss Group चे Non-Executive चेयरमॅन आणि प्रसिद्ध बिझनेस टायकून रवी घई यांची नातं आहे. मुंबईत एका खासगी समारंभात दोघांचा साखरपुडा झाला. दोन्हीकडची कुटुंब आणि जवळचा मित्र-परिवार या सोहळ्याला उपस्थित होता.रवि घई Graviss Group चे माजी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. हा ग्रुप हॉस्पिटॅलिटी आणि फूड बिझनेसमध्ये सक्रीय आहे. त्यांच्याकडे मुंबईत InterContinental Marine Drive Hotel आणि The Brooklyn Creamery सारखे मोठे ब्रांड आहेत. त्या शिवाय Graviss Hospitality Ltd नावाची एक कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे.