भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या चाहत्याला दिलेले वचन पूर्ण केले आहे. सचिनने जम्मू आणि काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आमिर हुसेन लोनची भेट घेतली आहे.
काही दिवसापूर्वी सचिनने आमिर हुसेन लोनचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी सचिनने आमिरला शब्द दिला होता, जेव्हा तो जम्मू-काश्मीरला येईल, तेव्हा त्याची भेट घेईल. आता सचिनने भेट घेतल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सचिन सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. ज्याने यापूर्वी काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व्हिडिओने सचिनचे लक्ष वेधून घेतले होते. दोघांमध्ये क्रिकेटबद्दल चर्चा झाली. काश्मीरचा हा फलंदाज आपल्या आदर्शाला भेटण्याचा उत्साह आणि आनंद लपवू शकला नाही.
आमिर आठ वर्षांचा असताना वडिलांच्या कारखाण्यात झालेल्या अपघातात त्याचे दोन्ही हात गमावले.
सचिनने आमिरचे इच्छाशक्ती, जिद्द आणि खेळाबद्दलची आवड याचे कौतुक केले. सचिनने सांगितले की, आमिर त्याच्या मेहनतीमुळे जिथे आहे तिथे पोहोचला आहे.
सचिनने आमिरला एक बॅट भेट दिली ज्यावर लिहिले होते, ‘आमिर हा खरा हिरो आहे. देशाला अशीच प्रेरणा देत राहा. तुला भेटून आनंद झाला.’