पाकिस्तान क्रिकेट टीमने बाबर आझम याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप मोहिमेचा शेवट विजयाने केला. पाकिस्ताने साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी मिळालेलं 107 धावांचं आव्हान हे 7 विकेट्सने गमावून पूर्ण केलं. पाकिस्तानला हे आव्हान पूर्ण करण्यातही नाकी नऊ आले होते. मात्र शेवटी जिंकले. पाकिस्तानचा हा एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. मात्र यानंतरही पाकिस्तानला सुपर 8 मध्ये पोहचता आलं नाही. पाकिस्तानचा गाशा गुंडाळल्यानंतर कॅप्टन बाबर आझमने कॅप्टन्सी सोडण्याबाबत स्पष्टच भूमिका मांडली.
टी-२० वर्ल्डकप मधून आता पाकिस्तानला माघारी परतावे लागले आहे. या वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानने चार सामने खेळले असून केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. पाकिस्तानविरुद्ध आयर्लंड सामन्यात पाकिस्तानने रडत सामना जिंकला. सेंट्रल ब्रॉव्हर्ड रिजिनल पार्क येथे रंगलेल्या पाकिस्तानविरुद्ध आयर्लंड सामन्यात पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला.
बाबर आझम
बाबर आझमने आयर्लंडविरुद्ध ३४ चेंडूत नाबाद ३२ धावा करून या स्पर्धेत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. बाबरने चार डावात १०१.६६च्या स्ट्राईक रेटने आणि ४०.६६च्या सरासरीने १२२ धावा केल्या. कर्णधार म्हणून कदाचित शेवटचा टी-२० वर्ल्डकप असल्याची शक्यता आहे तर या बाबरने वर्ल्डकपमध्ये १७ सामन्यात ५४९ धावा केल्या आहेत.
सामना पार पडल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. बाबरने यावेळी कर्णधारपदाबाबतही प्रतिक्रिया दिली. “जेव्हा मी याआधी कॅप्टन्सी सोडली होती, तेव्हा मला वाटलं होतं की आपण आता कर्णधार रहायला नको, तशी मी घोषणा केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मला कॅप्टन केलं हा त्यांचा निर्णय होता. आता मी पुन्हा कर्णधारपद सोडंल, तर मी सांगेन. मी आतापर्यंत कर्णधारपद सोडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही हा निर्णय पीसीबीला घ्यायचा आहे”, असं बाबरने स्पष्ट केलं.